हदगाव : पाच एप्रिल नंतर आलेल्या लोकांचे करणार ‘अलगीकरण’ – उपविभागीय अधिकारी वडदकर


शोधासाठी हिमायतनगर व हदगांवात प्रत्येकी १७ पथके तैनात


हदगांव दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – हदगाव हिमायतनगर तालुक्यात गावात किंवा शहरात कुठेही दि.५ एप्रिल नंतर बाहेरून आलेल्या लोकांना शोधून काढून व त्या पुर्वी आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांच्या मध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आल्यास अलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी जाहीर केला आहे.
संपूर्ण जग कोरोनाच्या वेढ्यात अडकले असतांना भारतात सह नांदेड जिल्ह्यात सुद्धा याविषयी मोठी दहशत पसरली आहे. देशात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे त्यामुळे अशा परिस्थितीत कोणत्याही क्षणी नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो. त्याकरिता दक्षता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जाणून हदगावचे उपविभागीय दंडाधिकारी महेश वडदकर यांनी दि.५ एप्रिल नंतर तालुक्यात आलेल्या प्रत्येकाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (अलगीकरण) करण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबतचे आदेश त्यांनी नगरपालिकेला व प्रत्येक ग्रामपंचायतीला दिले आहेत.
हदगांव शहरात सतरा वॉर्ड असून सतरा पथक नेमले आहेत. या पथकात एक डॉक्टर एक, नगरपालिका कर्मचारी, एक शिक्षक यांची नियुक्ती केली आहे. या पथकाने प्रत्येक घरी जाऊन यापूर्वी पुणे मुंबई किंवा इतर महानगरातून आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांच्यात कोरोनाचे काही लक्षण आढळून आले असतील तर अशा लोकांना होमक्वारंटाईन ऐवजी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. म्हणजे या लोकांना गावाशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्कात येणार नाहीत अशा पद्धतीने राहण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे त्यासाठी गावातील शाळा कॉलेज समाज मंदिर किंवा अंगणवाडी इमारत अधिग्रहित करावी असे निर्देश उपविभागीय अधिकारी वडदकर यांनी दिले आहेत. शिवाय मागील चार दिवसात म्हणजे दिनांक ०५ एप्रिल पासून नंतर आलेल्या लोकांना सक्तीने कुटुंबापासून अलगीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या या लोकांच्या राहण्याची जेवणाची व इतर सर्व व्यवस्था समाज कल्याण विभागाच्या सामाजिक न्याय भवन या वस्तीगृहात इमारत क्रमांक एक व इमारत क्रमांक दोन मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामस्तरावर देखील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील व आशा वर्कर यांनी असे प्रवासी नागरिक शोधून काढून त्यांची शासनाच्या खर्चाने व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!