भोकर : गरीब मजूरांना खा.चिखलीकर यांच्या हस्ते पालावर जाऊन अन्नधान्य वाटप

नांदेड दि. ९ एप्रिल , प्रतिनिधी – राहयला घर नाही, हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशा त्रिवेनी अवस्थेत कोरोनाशी लढा देणार्‍या भोकर शहराच्या बाहेर पाल मारुन जीवन जगणार्‍या गरीब मजूरांना नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी मजूरांच्या पालावर जावून त्यांना अन्नधान्याचे वाटप केले .
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे भोकर शहरातून जाणार्‍या नॅशनल हायवे रस्त्यावर मोलमजूरी करुन जीवन जगणार्‍या 50 ते 60 कुटूंब असलेल्या मजूरांना रस्त्यालगत पाल ठोकून आहेत. रस्त्याचे काम बंद असल्यामुळे हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशा अवस्थेत जगणार्‍या या गरीब कुटूंबांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिलासा देण्यासाठी त्यांच्या पालमध्ये राहणार्‍या मजूरांच्या वस्तीवर जावून त्यांना 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, दाळ, तेल, साबण आदि जीवनाश्यक वस्तुचे कीटचे वाटप केले. यावेळी भोकरचे तहसिलदार, उपजिल्हाधिकारी व भाजपाचे दिलीप सोनटक्के, सुरेश राठोड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तहसील कार्यालयात आढावा बैठक : या प्रसंगी तहसिल कार्यालयात खा.चिखलीकर यांनी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेवून कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. ग्रामीण भागात घरोघरी जावून कोरोना संदर्भात माहिती जमा करणार्‍या आशा वर्करला अद्याप मास्क व सॅनेटरायझरचे वाटप करण्यात आले नसल्याची माहिती गट विकास अधिकारी रामोड यांनी बैठकीत दिली. त्यावेळी खा.चिखलीकर यांनी तुमच्या कार्यालयाचा व्यक्ती नांदेडला माझ्याकडे पाठून द्या माझ्याकडून त्यांच्यासोबत मास्क व सॅनेटायझर पाठवून देण्याचे मान्य केले. ग्रामीण भागातील खेडेगांवात सर्व ग्रामसेवकांना सूचना करुन गावाची साफसफाई करुन घेवून जंतूनाशक फवारणी करण्यास सांगितले.ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत असा कुटूंबांना धान्य पुरविण्यासाठी आपण तयार आहोत असे सांगितले. त्या नंतर पोलीस विभागाला आणि पत्रकारांना मास्क व सॅनेटायझरचे वाटप केले

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!