रुई बु . : मध्यप्रदेशचे चार तरुण चाकूर येथून गावाकडे निघाले पायी


रुई बु दि. ९ एप्रिल , वार्ताहर-नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर कोणतेच वाहन चालू नसल्यामुळे व राज्याच्या सीमा सील केल्याने राज्यातील परराज्यातील नागरिकाला जाण्यासाठी कोणताच पर्याय नसल्यामुळे मध्यप्रदेश मधील रहिवासी असलेले चार नागरिक लातूर येथे एका मिल मध्ये कामगार म्हणून कामावर होते सर्व कंपन्या बंद पडल्यामुळे व कामगाराची उपासमार होत असल्याने चाकूर येथून पायी पायी राज्य महामार्गाने नांदेडकडे निघाले असून त्यांच्या जवळ पाण्याची बॉटल अथवा खाण्या पिण्याची सोय नसल्याने भुकेने व्याकुळ झाल्याचे कृष्णूर जवळ दिसून आले आहे.
राज्यात व देशात कोरोना विषाणूच्या धिंगान्यामुळे सर्वत्र नागरिकाची बेहाल होताना दिसून येत असली तरी अनेकाचा पोटा पाण्याचा प्रश्न उद्भवला आणि राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे व वहाणाची सोय नसल्याने मध्यप्रदेशचे रहिवासी असलेले हे तालुका मोगन , जिल्हा रिव्हा येथील रहिवासी असून ते लातूर येथील ममता मिल येथे कामगार म्हणून काम केले व त्यांची नावे शंकर गिरधारी साखेद , गोविंद महेश साखेद , दिलीप श्रीराम साखेद , श्रीनिवास हिन्चलान असी या मध्येप्रदेशच्या कामगाचे नावे आहेत.
शासनाने कामगारांना आवाहन केले होते कि कामगारांनी आहे तेथेच राहावे , आपले असलेले ठिकाण सोडू नये , परंतु लॉक डाउन किती दिवस राहणार व पोटाला रोजगार कधी मिळणार या विवंचनेत घराची व परिवाराची ओढ या कामगाराना लागल्याने हजारो कि. मी. पायी चालून गाव गाठण्याचा चंग या कामगारांनी बांधला आहे .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!