धर्माबाद पोलीसानी चार लाख 60 हजाराचा गुटखा व तंबाखू मिश्रित पदार्थ केला जप्त.


दोन्ही भावावर गुन्हा दाखल व अटक .


धर्माबाद दि. ९ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – शहरातील किराणा दुकान गोदाम मधुन वाहनात, गुटखा व तंबाखू मिश्रीत माल भरत असताना पोलिसांनी लाखो रुपयेचा मुद्देमालसह जप्त केला असुन दोन जनांना ताब्यात घेतले आहे.ही कारवाई दि. ७ एप्रिल रोजी सकाळी संचारबंदीत पोलिस पेट्रोलींगं करताना करण्यात आली .
धर्माबाद शहरात बेकायदेशीर गुटखा विक्री केली जात आहे.संचारबंदी लागू असतानाही गुटखे बहादर विक्रेत्यांना, जीवन आवश्यक वस्तू पेक्षा गुटखा महत्वाचा वाटु लागला आहे. जादा दराने विक्री करून आपली पोळी भाजून घेण्यासाठी गुटखा खाणा-याची लुट करीत आहेत.
धर्माबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे हे सकाळी गस्त घालत असताना राज्यात बंदी असलेला गुटखा,व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची खबर मिळताच सपोनि अशोक उजगरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन महिंद्रा पिकअप MH 26 H 4104 सदरील गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत गुटखा व तंबाखू मिश्रीत माल आढळून आला. त्यात सखोल चौकशी केली असता गोदामातुन अंदाजे लाखो किंमत असलेला बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला,त्यात रजनीगंधा,बाबा जर्दा,मिराज,राजनिवास,जाफरानी जर्दा आदी गुटखा व तंबाखू जन्य वस्तू , अंदाजे लाखो रुपयेचा माल मिळालाआहे.
. सदरील गुटखा हा रविकुमार शंकरराव कोंडावार, राजकुमार शंकरराव कोंडावार यांचा असल्याचे निष्पन्न झाले या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल झाला आहे .

अन्न प्रशासन अधिकारी जिंतुरकर यांनी यातील प्रतिबंधक माल कोणता ? अन्नप्रतिबंधक माल कोणता ? याची यादी केली असता एकूण चार लाख 60 हजार 190 रूपयांचा जप्त केला .अन्न सुरक्षा व मानद कायद्याप्रमाणे शिक्षापात्र कलमा 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कलम 34,188,272,२73 या नुसार नोंदणी करण्यात आली आहे .
अनेक दिवसापासून छुप्या पध्दतीने चालणारा धंदा उघड झाल्याने आता तरी बंद राहील का? लाँकडाउन असताना आशा मालाचा टेंम्पो आलाच कसा? या धंद्यामागचा डाँन कोण? हा माल कोठे तयार होतो ?अशा मालाचा कायमचा बंदोबस्त होईल का? जनता असा सवाल करीत आहेत .पो.निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शना खाली स.पो.नि.पुढील तपास करीत आहेत .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!