ईस्लापुर: कुपटी येथे घराला आग,40 हजाराचे नुकसान


ईस्लापुर दि. ८ एप्रिल वार्ताहर –परिसरातील कुपटी येथील एका घराला अचानक आग लागल्याने अंदाजे या आगीत 40 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
कुपटी येथील रहिवासी असलेल्या राधाबाई परसराम माझळकर यांच्या राहत्या घराला दि.8 एप्रिल बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अचानक घराला आग लागली.
या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य ,अन्नधान्य जळुन खाक झाले आहे. राधाबाई माझळकर या कामा निमीत्य बाहेरगावी असल्याने या कुलुप बंद घराला आग लागल्याने या आगीचे कारण कळु शकले नाही.
आग लागल्याची माहीती सर्वप्रथम गावक-याना कळताच गावक-यानी आग विझवुन आटोक्यात आणली. सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील गंगाधर पंगनवाड यांनी महसुल विभागाला कळवुन या गटाच्या जि.प.सदस्या कमलताई हुरदुके,आढावा समितीचे अध्यक्ष भगवान हुरदुके यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ घटना स्थळी भेट दिली आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!