धर्माबाद : श्री हनुमान व महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने 51 हजारांची शासनाला मदत.


धर्माबाद दि. ८ एप्रिल , तालुका प्रतिनिधी- कोरोनाची साथ व 22 मार्चपासून लॉकडाऊन असल्याने येथील श्री हनुमान व महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर कमल किशोर काकानी यांनी मुख्यमंत्री निधीस रुपये 51 हजाराचा धनादेश येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना सुपूर्द केला .
येथील काकाणी परिवार हा दानशूर परिवार आहे, तरुण उद्योजक व प्रसिद्ध व्यापारी सुबोध काकानी हे दररोज 100 किलोच्या तांदुळाची खिचडी वाटप करीत आहेत. डॉक्टर कमल किशोर काकानी हे येथील श्री हनुमान व महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. हनुमान जयंतीच्या निमित्ताने होणारा खर्च कोरोना ग्रस्त साठी मुख्यमंत्री निधीस द्यावा असा ठराव ट्रस्टच्या सभासदांना सांगितला आणि सर्वांनी त्यांना मान्यता दिली. आज हनुमान जयंती साध्या पद्धतीने करून होणारा खर्च रुपये 51 हजार हा मुख्यमंत्री दिस देण्यात आला. येथील उपविभागीयअधिकारी राजेंद्र शेळके यांना देण्यात आला.
याप्रसंगी येथील तहसीलदार दत्तात्रय शिंदे. मुख्य अधिकारी मंगेश देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक खंदारे, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर शेख इक्बाल, यांची प्रमुख उपस्थिती होती
रुपये 51 हजाराचा चेक देताना ट्रस्टीचे विश्वस्त विनायक कुलकर्णी,सचिव कैलास जी ईनानी, अर्चक गोविंदराव संगमकर यांचे सुपुत्र बालाजी संगमकर, सुबोधजी काकाणी, किशोर चिंतावार, गोविंद पवार इंजिनियर, डॉ.राघवेंद्र पडगलवार, तसेच मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गंगाधर मिसाळे, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव हनुमंते, माजी अध्यक्ष कृष्णा तिम्मापुर, महेश जोशी, सुरेश घाळे, आदींची उपस्थिती होती.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!