धर्माबाद: विविध व्यापारी व मित्रमंडळी कडून एक लाख 31 हजारांची मुख्यमंत्री निधीस मदत.


धर्माबाद दि. ८ एप्रिल ; तालुका प्रतिनिधी – धर्माबाद येथील व्यापारी व दानशूर व्यक्ती कडून तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून अन्नदान सत्र चालू असून आता शासनाच्या तिजोरीत मदत म्हणून धर्माबाद येथील विविध संस्था, व्यापारी, दानशूर मंडळी मुख्यमंत्र्याच्या निधीस मदत करीत आहेत. येथील काही दानशूर व्यापारी व मित्रमंडळी मिळून रुपये एक लाख 31 हजारांचा चेक येथील उपविभागीय अधिकारी मा. राजेंद्र शेळके यांच्या स्वाधीन करण्यात आला.
संकटकाळी नेहमी मदत करणारे येथील नरेंद्ररेडी, प्रकाशसेठ गुजराती, डॉक्टर अनिल रत्नाळीकर , सत्यम सेठ उत्तरवार, एनसीसी ऑफिसर संदीप नलवार, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रभाकर कमटलवार, शिवसेना कार्यकर्ते अंकुश भोसले, मा. तालुकाप्रमुख गणेश गिरी, उपप्रमुख राजेश सिरामने, संजय बच्चूवार, छावा माजी जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाटील हारेगावकर, संचालक दत्तहरी आवरे व शूर व्यक्तीकडून रुपये एक लाख 31 हजार तीनशे चा चेक देण्यात आला.
याप्रसंगी तहसीलदार दत्तात्रेय शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर शेख एकबाल, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक खंदारे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जी.पी. मिसाळे, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव हनुमंते, माजी अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार महेश जोशी, संजय कदम, सुरेश घाळे यांची उपस्थिती होती.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!