‘माझ्या पत्नीला तू मोबाईल का लावतोस’ म्हणून कुटुंबावर केला कत्तीने वार; पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी…!


मालेगाव रोडवरील घटना, आरोपी पळून जाताना गंभीर जखमी…!

अर्धापूर, दि.८ तालुका प्रतिनिधी – :माझ्या पत्नीस तू मोबाईल का लावतोस या कारणावरून पती, पत्नी, व मुलावर धारदार कत्तीने वार केल्याने पत्नी जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने या हल्ल्यात अकरा वर्षीय मुलगा बचावला आहे. हा हल्ला करून पळून जात असताना आरोपी अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना अर्धापूर तालुक्यातील उमरी येथून मोटारसायकलने मालेगाव कडे जात असता दि.६ एप्रिल रोजी साडे सात वाजताच्या दरम्यान घडली. जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, उमरी (ता.अर्धापूर) येथून काम आटोपून साडे सात वाजताच्या सुमारास मोटर सायकल घेऊन मालेगाव कडे येत असतांना हल्लेखोर प्रभु मारूती गुंडले वय-३२ गाडी वरून खाली उतरून छाया रावसाहेब पांचाळ व रावसाहेब पांचाळ व मुलगा मोटार सायकलवरून येत होते. मालेगाव येथील मालेगाव-अर्धापूर रोडवरील महावितरण कंपनीच्या ऑफिससमोर गाडी पुढे येऊन धारदार कतीने मानेवर वार केल्याने छाया रावसाहेब पांचाळ (वय-४०) ह्या जागीच ठार झाल्या तर रावसाहेब पांचाळ (वय-४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा सत्यम रावसाहेब पांचाळ (वय ११) मात्र बालबाल बचावला आहे. हा हल्ला आरोपी प्रभु मारूती गुंडले याने ‘तू माझ्या पत्नीला मोबाईल का लावतो’ या कारणावरून केल्याची फिर्याद रावसाहेब पांचाळ यांनी दिल्या पोलिसांनी प्रभू गुंडले विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी रावसाहेब पांचाळ यांना नांदेडच्या येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवशे, जमादार परमेश्वर कदम, हेमंत देशपांडे, शेख मजाज खाॅन यांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान हल्लेखोर प्रभु गुंडले हा अर्धापूर कडे मोटार सायकलवरून पळून जात असताना त्याने वसमत फाटया जवळ एका ट्रकला जबर धडक दिल्याने तो ही गंभीर जखमी झाला असून त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!