मांजरम : विज कोसळून मृत पावलेल्या शिंदे कुटुंबीयाचे खासदार चिखलीकर व आ. पवार यांनी भेट देऊन केले सांत्वन.


मांजरम दि. ८ एप्रिल वार्ताहर- मांजरम येथील शेतकरी कुटुंबावर विज कोसळली होती.यात एका तरुण शेतकऱ्यांचा व एका बैलांचा जागीच मृत्यू झाला होता.तर शेतकऱ्यांच्या मुलगा थोडक्यात बालंबाल बचावला होता.सदरीत अघातग्रस्त कुटुंबाची खा.प्रताप पाटील चिखलीकर व आ. राजेश पवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मुलांच्या शिक्षणासाठी नांदेड येथे राहत असलेले हे कुटुंब कोरोना मुळे गावाकडे आले आहे. मांजरम येथील सदन शेतकरी मारोतराव व्यंकटराव शिंदे वय ४२ वर्ष हे सोमवार ६ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता आपल्या मुला सोबत शेताकडे गेले. सालगडी सुटीवर असल्याने बैलांना चारापाणी करावे व तन नाशक फवारणी करून घ्यावे अश्या हेतूने आठवीत शिकणारा कृष्णा वय १३ वर्ष याला ही सोबत घेतले.स्वच्छ आकाश क्षणातच भरून आले पहाता पहाता पाऊस पडला.विजेचा लखलखाट सुरू झाला.याच घाईत बैलांना सोडून बांधत असताना एक बैल व शेतकरी मारोती शिंदे यांना विजेचा जबर शाॅक लागून जागीच ठार झाले.तर शेतकऱ्यांचा मुलगा कृष्णा व एक बैल बालंबाल बचावला.मारोतराव शिंदे हे मोठ्या शेतकरी कुटुंबातील होते.नृसिंह सुत गिरणी खानापुर येथील माजी संंचालक कै.व्यंकटराव पाटील शिंदे यांचे ते चौथे चिरंजीव होते.त्यांच्या मागे भाऊ, बहिण,पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर आ.राजेश पवार यांनी ८ एप्रिल रोजी दुपारी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर,दिलीप वाघमारे, आदी मंडळी उपस्थित होती.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!