किनाळा : संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्याना शंकरनगर येथे कांबळे यांच्या कडून धान्य वाटप


किनाळा दि. ८ एप्रिल वार्ताहर – संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूची साथ असल्यामुळे देशात शासनाने संचारबंदीसह लाँकडाऊन घोषित केले त्यामुळे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे कित्येक सामन्य कुटंबातील नागरीकावर उपासमारीची वेळ आली असताना बिलोली तालुक्यातील बहुजन वंचित आघाडीचे बिलोली तालुका सचिव गंगाधर कांबळे यांच्या वतीने शंकरनगर तालुका बिलोली येथील मोल मजूरी करणा-र्यांना धान्य वाटप करून मोठा आधार दिल्याने त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
सामान्य कुटंबातील सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे बहुजन वंचित आघाडीचे तालुका सचिव म्हणून कार्यरत असलेले रामतीर्थ तालुका बिलोली येथील बांधकामाचे व्यवसाय करून सामान्य कुटंबातील गंगाधर लक्ष्मण कांबळे हे आपल्या परिवाराचा सांभाळ करणारे शंकरनगर परिसरात कोणत्याही सामजिक कार्यात सदैव पुढाकार घेतात आज पूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या महामारी आजाराचा नायनाट व्हावे यासाठी लाॅकडाउन करून संचारबंदी घोषित करण्यात आली असल्याने शंकरनगर येथील कित्येक मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह करणारे यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची चुल पेटवने अवघड झाले अशा सामान्य नागरिकांना आधार देण्याचा संकल्प हाती घेउन अशा कुटुंबियांना तांदुळ, तेल , मिरची, हळद, साखर , चहा पत्ती ,मिठ, जिरे असे जिवणावश्यक असलेले धान्य देऊन अनेकांना आधार देण्याचे काम केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे, चांदु सोनकांबळे, दत्ता पाटील देगलुरे, दिपक कांबळे, पत्रकार मोरे मनोहर, सतार इनामदार, राहुल सोनकांबळे, रामा कांबळे,फेरोजभाई आदिसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!