रुई बु : ” फुलांचे झाले अश्रू “, लॉक डाउन मुळे टवटवीत फुले कोमेजली ; शेतकऱ्यावर आर्थिक संकट


रुई बु दि. ८ एप्रिल , वार्ताहर– नायगाव तालुक्यासह अन्य तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतात फुलबाग फुलानी बहरली असली तरी शासनाच्या आदेशानुसार राज्यात व देशातील लॉकडाऊनमुळे विक्रीला जाणारे फुले शेतात वाळू लागली असल्यामुळे यंदा शेतकऱ्यावर आर्थिक संकट असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.
तालुक्यातील रुई बु व रुई परिसरात फुल उत्पादक शेतकऱ्यानी मोठ मोठ्या फुलबागा सजवील्या असून शेतकऱ्याच्या शेतातील फुले मार्केट मध्ये लॉकडाऊनमुळे विक्रीस जात नसल्याने खिशाला आर्थिक चणचण निर्माण झाली त्यासाठी शासनाने सदरची बाब लक्षात घेवून अडचण सोडवली जावी असी मागणी शासनाकडे फुलबाग शेतकऱ्यानी केली आहे
नायगाव तालुक्यासहअन्य तालुक्यात सुध्दा लॉकडाऊनमुळे फूलबागेवर वनवा लागला असल्याचे कांही शेतकऱ्याचे म्हणणे असून खांबाळा ,इजळी, न्याहाळी, वाडी,चिकाळा,म्हाटी,माळकोठा इत्यादी गावच्या शेतकऱ्यांकडे मोगरा,काकडा,गुलाब,झेंडू निशिगंधा, गलांडा इतर अनेक फुलांचे उत्पादन चालू असल्यामुळे करोना व्हायरस मुळे भारत बंद असल्याकारणाने फूल उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे शासन स्तरावर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी फुल शेतकऱ्यांनी केली आहे .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!