रुई बु: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना तांदूळ व कडधान्याचे वाटप


रुई बु दि. ८ एप्रिल , वार्ताहर- नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथील शाळेतील उर्वरित शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शिल्लक असलेला तांदूळ , डाळ , मसूर दाळ , मटकी , वटाणा, हरभरा , कडधान्याचे वाटप दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ठीक १० वाजून ११ मिनिटानी पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
तालुक्यातील रुई बु जिल्हा परिषद शाळा ही शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आली होती परंतु संपूर्ण भारतभर चालू असलेली कलम १४४ कलमाचे उल्लंघन होवू नये म्हणून कोरोना विषाणूची साथ सर्वत्र पसरत असल्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
शाळा बंद ठेवण्यात आल्यामुळे शाळेत उपलब्ध असलेला शालेय पोषण आहाराचा धान्य साठा सुध्दा खराब होण्याची शक्यता असल्याने उपरोक्त शासनाच्या पत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक रुई बु येथील शाळेचे मुख्याध्यापक आर , जी कोठेवाड , बि जी बासटवार , दैनिक प्रजावाणीचे पत्रकार माधव पवार यांच्या उपस्थित पोषण आहार वाटप करण्यात आले
रुई बु येथील जिल्हा परिषद शाळेत उर्वरित धान्य साठा विध्यार्थाना समान स्वरूपात वाटप करण्यसाठी दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ठीक १० वाजून ११ मिनिटानी शालेय व्यवस्थापण समितीच्या उपस्थितीत शासनाच्या परवानगीनुसार वाटप करण्याचे ठरविले असून यावेळी पोषण आहार वाटप करते वेळी शालेय समितीचे अध्यक्ष संभाजी भीमराव जिगळे ,उपाध्यक्ष किशनराव दत्ता सोनटक्के , सदस्य प्रतिनिधी हणमंत गोविंदराव वाघमारे , सुभाष चंचलवाड , मारोती पवार , पत्रकार लक्ष्मण पवार आदी पालक वर्ग उपस्थित होते . यावेळी सोशल डिस्टंसिंग द्वारे धान्य वाटप करण्यात आले .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!