मालेगाव रोडवर धारदार शस्त्राने वार…पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी…


    अर्धापूर, दि.६ (वार्ताहर) : तालुक्यातील  उमरी येथून मोटारसायकलने मालेगाव कडे येत असतांना वीजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोर पती, पत्नी व मुलगा यांना रस्त्यावर अडवून धारदार शस्त्राने वार केल्याने पत्नी जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले  आहे. तर मुलगा मात्र या हल्ल्यात बालबाल बचावला.       पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, उमरी (ता.अर्धापूर) येथून कामे आटोपून साडे सात वाजताच्या सुमारास मोटर सायकल घेऊन मालेगाव कडे येत असतांना अज्ञात हल्लेखोरांनी गाडी वरून खाली उतरून छाया रावसाहेब पांचाळ व रावसाहेब पांचाळ व मुलगा मोटार सायकलवरून येत होते. मालेगाव-अर्धापूर रोडवरील महावितरण कंपनीच्या ऑफिससमोर गाडी पुढे येऊन धारदार शस्त्राने वार केल्याने छाया रावसाहेब पांचाळ (वय-४०) ह्या जागीच ठार  झाल्या तर रावसाहेब पांचाळ (वय-४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा सत्यम रावसाहेब पांचाळ (वय ११)  मात्र बालबाल बचावला आहे. पोलिसांनी तातडीने रावसाहेब पांचाळ यांना नांदेडच्या येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवशे, जमादार परमेश्वर कदम, हेमंत देशपांडे, शेख मजाज खाॅन यांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यासाठी मदत केली. दरम्यान हा हल्ला नेमका कशातून झाला हे स्पष्ट झाले नाही.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!