माहूर : स्वच्छता राखण्यास व अतिक्रमण हटविण्यास वानोळा ग्राम पंचायत अपयशी-.अमोल मोहिते


माहूर दि. ६ एप्रिल, तालुका प्रतिनिधी – तालुक्यातील वानोळा गावातील अंतर्गत रस्त्याला लागून असलेली सांडपाणी वाहून नेणारी नाली गेल्या सात/आठ महिन्या पासून उपसलीच नसल्याने व तिच्यावर अतिक्रमण केल्यामुळे तुडुंब भरल्याने सर्वत्र दुर्गँधी पसरली असून डासांचे प्रमाण अधिक वाढल्याने साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाल्या संदर्भात ग्राम पंचायत मध्ये वारंवार तक्रार देवून सुध्दा सरपंच व ग्रामसेवक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे विरुध्द प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्याची मागणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना दि.3 एप्रील रोजी स्थानिक नागरीक अमोल दत्तराव मोहिते यांनी पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणुने थैमान घातले असून स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असताना व संपूर्ण देशात आपत्ति व्यवस्थापन कायदा लागू असतानाही पेसा अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच हजार लोक संख्या असलेल्या वानोळा ग्राम पंचायतचे सरपंच डॉ.रविकुमार मेंडके व ग्रामसेवक डी.बी.श्रीमंगले हे नालीवरील अतिक्रमण काढण्या बाबत व नाली स्वच्छ करण्या बाबत उदासीन आहेत.असा आरोप मोहिते यांनी पाठविलेल्या तक्रारीत केला असून प्रचलित नियमा नुसार त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तक्रार केवळ राजकीय हेतूने प्रेरित : सरपंच या तक्रारी बाबत आमच्या प्रतिनिधिनी सरपंच डॉ,मेंडके यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यानी सागितले कि गावातील नाल्या कालबाह्य झाल्या असून त्या दुरुस्त करण्यासाठी वरीष्ठ स्तरावरून निधी प्राप्त होत नाही. सदरची नालीसाफ करण्याचा प्रयत्न केला असता जाणीव पूर्वक अडथळा निर्माण केल्या जात असून संबंधितांना नोटिस दिली असून , तक्रार केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप यांनी केली.

ठराव पारित होतो पण… अंमलबजावणीच होत नाही : उपसरपंच या संदर्भात उपसरपंच सुरेश राठोड यांचे मत जाणून घेतले असता अन्य सदस्यांच्या मदतीने मी मासिक बैठकीत गावातील सर्व नाल्या स्वच्छ करण्या संदर्भात मांडलेला ठराव पारित होऊन सुध्दा त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप केला.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!