धर्माबाद : बाजार समिती व व्यापारी असोसिएशनच्या वतीने 400 हमालमापाडींना राशनचे किट वाटप.


धर्माबाद दि. ६ एप्रिल, तालुका प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशात संचारबंदी लागू असल्यामुळे सर्व व्यापारपेठ कडकडीत बंद आहेत.त्यामुळे मजूरांना हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपवासमारीची वेळ आली आहे.अशा परीस्थिती येथील बाजार समिती व व्यापारी असोसिएशनच्या वतीने बाजार समितीच्या आवारात कार्यरत असलेल्या ४०० हमालमापाडींना जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप शनिवारी करण्यात आले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य मराठवाडयात उत्कृष्ट असल्याची नोंद आहे.तसेच वार्षिक उत्पन्न करोडो रुपयांत असल्यामुळे हि बाजार समिती मराठवाडयात अव्वल क्रमांक आहे.बाजार समिती नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असते.यापूर्वी सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे महापुर आला होता.यावेळी महापुरात अडकलेल्या गोर गरीब जनतेला रु.चार लाखाचा असा भरीव मदतीचा हात येथील बाजार समितीने दिला होता.
बाजार समितीच्या सामाजिक कार्याचे कौतुक तात्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले होते.तसेच कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील गोर गरीब जनतेवर उपवासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे पणन महासंघाचे प्रधान सचिव महाराष्ट्रातील हमालपाडीना मदत करण्याच्या सुचना सर्व जिल्हा निबंधकास दिले आहे.धर्माबाद येथील बाजार समितीतील सर्व हमालमापाडीवर उपवासमारीची वेळ आली असल्याचे निदर्शनास हमालमापाडीचे संचालक गौसभाई यांनी बाजार समितीच्या लक्षात आणून दिले.व हमालमापाडींना मदत करण्याची लेखी मागणी बाजार समितीकडे केली आहे.सदरील आलेल्या अर्जाचे सहानुभुती पूर्वक विचार करून येथील बाजार समितीत कार्यरत असलेल्या जवळपास ४०० हमालमापाडींना जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सदरील जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपास जिल्हा निबंधक प्रविण फडणीस, सहाय्यक निबंधक रमेश कांबळे यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे.शनिवारी येथील बाजार समितीत अधिकृत व ज्या हमालांची बाजार समितीत नोंद नाही.अशा एकूण ४०० हमालमापाडींना जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, उपसभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर, सचिव चंद्रकांत पाटील जुन्नीकर, संचालक शामसुंदर झंवर, आनंदराव शिंदे, संचालक विनायकराव कुलकर्णी, रमेश गौड,देवन रेड्डी, संचालक गोविंद जाधव रोशनगावकर,वर्णी नागभुषण, शिवसेनेचे संचालक शिवराज पाटील मोकलीकर, दत्ताहारी पाटील आवरे, साहाय्यक सचिव वैभव कुलकर्णी यांच्यासह अनेक कर्मचारी व संचालक, शेतकरी व हमालमापाडी बांधव उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!