किनाळा येथे 40 रक्तदात्यांनी केले रक्तदान


किनाळा दि. ६ एप्रिल वार्ताहर – कोरोना सारख्या महामारीच्या संकटामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे आरोग्य मंत्री व जिल्हा अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार एक सामाजिक बांधिलकी म्हणून किनाळा तालुका बिलोली येथील कै.संजय माधवराव खराटे यांच्या स्मरणार्थ खराटे मित्र मंडळाच्या वतीने दि.5 एप्रिल रोजी महादेव मंदिराच्या प्रांगनात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कै. संजय पाटील खराटे मित्र मंडळाच्या वतीने दि.5 एप्रिल रोजी सकाळी नउ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शासनाच्या नियमानुसार कायध्याचे उल्लंघन न होउ देता कोरोना ग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . सोशल डिस्टन्स नियमाचे काटेकोरपणे पालन करून देशातील कोरोना ग्रस्तांसाठी रक्तदान करण्यात आले.
किनाळा येथे असलेल्या महादेव मंदीराची यात्रा शासनाने संचारबंदीसह लाॅकडाउन केले असल्याने हि यात्रा रद्द करण्याची वेळ आल्याने कै.संजय माधवराव खराटे यांच्या स्मरणार्थ खराटे मित्र मंडळाच्या वतीने मंदिराच्या प्रांगनात खराटे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून नांदेड येथील गुरूगोविंद सिंग ब्लडबॅक यांच्या कडे 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी खराटे मित्र मंडळाच्या वतीने विशेष परिश्रम घेतले यावेळी गुरूगोविंद सिंग ब्लडबॅकेचे डॉ. प्रसाद बोरूळकर , डॉ. कनकदडे ,राजू जाधव , उद्धव मुळे ,गणेश चौधरी हर्षद महाजन , आकाश , चीलदा लिया आदिसह तलाठी शिंदे हे उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!