बिलोली : संचार बंदीच्या कालावधीतही अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाची धाडसी कार्यवाही

नायब तहसीलदार निलावाड आणि परळकर यांनी केली धाडसी कारवाई….


बिलोली दि.६ एप्रिल तालुका प्रतिनिधी – बिलोली तालुक्यातील अवैध उत्खननाचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालूच आहे दरम्यान बिलोली चे नायब तहसीलदार यांच्या पथकाने एका वाहनावर कार्यवाही करून त्यास बिलोली तहसील कार्यालयात उभे केले आहे. त्यांच्यावर रीतसरपणे एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
बिलोली तालुक्यातील अनेक ठिकाणी संचारबंदीचा कठोरपणे वापर होत असताना प्रशासनाने मात्र अवैध उत्खननासाठी आणि वाहतुकीसाठी जणू परवानगीच दिल्यासारखे वाहने मोठ्या मोठ्या प्रमाणात चालु असताना दिसून येत आहेत. दिनांक 4 एप्रिल 2020 रोजी सकाळी साडेसात वाजता कुंडलवाडी रस्त्यावर नायब तहसीलदार उत्तम निलावाड आणि नायब तहसीलदार अनिल परळकर यांनी अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. त्याच्यावर विचार पण एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे महसूल सूत्रांनी सांगितले .
विशेष म्हणजे यापूर्वी याच वाहतूकदार विरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई केली होती असे असताना त्याने पुन्हा कोणाच्या बळावर हे धाडस केले हे न उलगडणारे कोडे आहे बिलोली तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील अवैध रेती आणि अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतूक यांच्याविषयी चार पथके तयार करण्यात आली. या पथकांना सुद्धा अवैध मुरूम आणि रेती वाहतूकदारांनी आपल्या खिशात ठेवल्याची बतावणी करत असताना ऐकण्यात आले. गावात तालुक्यात ,जिल्ह्यात संचारबंदी असताना अवैध उत्खनन होते कसे ? त्याची वाहतूक कशी केली जाते हा मोठा संशोधनाचा विषय आहे .यात कुणाकुणाचे छुपे हात आहेत ? याचीही वरिष्ठ पातळीवरून चौकशी होण्याची गरज वाटते. बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी परिसरात दोन नायब तहसीलदार यांच्या उपस्थित सापडलेल्या या वाहनावरून हे स्पष्ट होते की काही व्यक्ती कोरोना महामारी च्या कालावधीत सुद्धा पैसा कमावण्याची लालसा बाळगून अवैध मार्गाचा उपयोग करताना दिसून येत आहेत याबाबत प्रशासन किती कठोर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!