हिंगोली दि. ४ एप्रिल , प्रतिनिधी – कुठल्याही आपत्कालीन दुर्दैवी दुरावस्थेत मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून मागील ३ दशकांपासून हिंगोलीच्या गायत्री शक्तीपीठाच्या गायत्री परिवाराने, कोरोना महामारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या राज्य आणि राज्याबाहेरील मजूर,गरीब रुग्ण,आणि त्यांचे नातेवाईक विद्यार्थी,अश्या एकूण १९०० पात्र लाभार्थ्यांना रोज गरमागरम व सात्विक मोफत भोजन २२ मार्च पासून निरंतर सुरू ठेवलआहे. गायत्री परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनि ह्या उपक्रमात सर्व धर्म समभाव,ठेवल्या बद्दल लाभार्थी कृतज्ञता व्यक्त करीतआहेत.
मराठवाड्यातील एकमेव अद्वितीय म्हणून धर्म, अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून जनकल्याणाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या गायत्री परिवाराने जागतिक आरोग्य संघटना,केंद्र आणि राज्यशासन,स्थानिक प्रशासन ह्यांच्या निर्देशाचे पालन करून जवळपास १९०० गरजुना गायत्री परिवार,रुग्णालये होस्टेल ,वस्त्या, आदी ठिकाणी द्वारपोच,मोफत भोजन पोचवण्यात यशस्वी झाल्या मुळे परप्रांतीय मजूर,रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, तामिळनाडू,केरळ, तेलन्गना,आदी राज्यातील कामगार, विध्यार्थी, संभाव्य उपासमार होणारे अति गरीब लोक,गायत्री परिवाराचे आभार व्यक्त करीत आहेत. गायत्री परिवार मोठ्या प्रमाणात गायत्री यज्ञाचे आयोजन करीत असताना अन्नदानाचा महायज्ञाचे आयोजन केल्यामुळॆ अनेक दानशूर मंडळींनी अन्नधान्य, किराणा व शेतकऱ्यांनी भाजीपाला देऊन गायत्री परिवाराला सहयोग दिल्या बद्दल परिवाराने त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत. कुणालाही ह्यात सहभागी व्हायचं असल्यास त्यांचं स्वागत असल्याचंही गायत्री परिवाराने म्हंटल आहे.विशेष म्हणजे अन्नदाना सोबतच ज्ञानदानाचे कार्य परिवाराने सुरूच ठेवले असून कोरोना संसर्ग आणि बाधा होऊ नये म्हणून गायत्री परिवारातील हे राष्ट्र्रक्षक मंडळी” काय करावं आणि काय करू नये” ह्या बाबत माहिती देत आहेत. त्यामुळे नागरिक देखील अन्नदाना सोबत ज्ञानदानास सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.हिंगोलीच्या गायत्री शक्तीपीठातून दररोज आयुर्वेदिक काढे, औषधी ,योगा बाबत जनसेवा सुरू असून कोरोना महामारी अनुषंगाने सामाजिक आणि व्यक्तिगत सुरक्षा नियम पाळल्याने ह्याच अनुकरण केल्या जात आहे.इच्छुकांनी पंतप्रधान ,मुख्यमंत्री निधी साठी सढळ हाताने आपत्कालीन परीरस्थितीसाठी आर्थिक आदी मदत करावी असे आवाहन करण्यात आलं आहे.ह्यापुढे मोफत भोजन पाहिजे असल्यास गायत्री परिवार,गायत्री शक्तीपीठ खांबाळा रोड हिंगोली येथे संपर्क साधावा अस आवाहन करण्यात आलं आहे.ह्या उपक्रमातील मंडळी अथवा अन्नदान लाभार्थ्या मध्ये ज्या नागरिकांना शारीरिक त्रास झाला त्यांना मोफत होमिओपॅथिक औषधी डॉ विजय निलावार ह्यानी त्यांचा दवाखान्यातून दिली असून ज्यांना तातडीच्या सेवा पाहिजे असतील त्यांनी शासकीय रुग्णालये,शासनमान्य हॉस्पिटल्स,व प्रशासनाने निर्देशित केलेल्या दवाखाण्यातून सुविधा घ्याव्यात,अस आवाहन केलं आहे.विशेष म्हणजे ह्या सर्व उपक्रमा बाबत जिल्हा प्रशासन आणि,संबंधित विभाग,ह्यांच मार्गदर्शन घेऊन हे कार्य सुरू ठेवल्याचही गायत्री परिवाराने स्पष्ट केलं आहे.