नांदेड दि. ४ एप्रिल , प्रतिनिधी – कोरोना महामारी च्या विरुद्ध आपले प्राण पणाला लावून मानवाच्या जीवित्वासाठी सेवा कार्य करणाऱ्या संबंधितांना नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील माजी नगराध्यक्ष व आर्यवैश्य समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथआप्पा उत्तरवार व कुटुंबीयांनी रोख रक्कम आणि एक यंत्र असे मिळून एकूण 11लाख 55 हजार रुपये व एक चारचाकी बोलेरो गाडी महामारी दरम्यान लढण्यास वापरण्यासाठी दिली आहे .उमरी ग्रामीण रुग्णालय,पोलीस विभाग,व होमगार्ड,आणि नगरपरिषद, चे मिळून एकूण 143 कर्मचारी ह्या तीन विभागातील लाभार्थ्यां साठी ही मदत संबंधितांकडे सुपूर्द केल्याची माहिती उत्तरवार कुटुंबीयांनी दिली.ह्या सेवे मूळे विजयआप्पा उत्तरवार व कुटुंबियांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
उमरी च्या ग्रामीण रुग्णालयातील एकूण 52 जणांना प्रत्येकी रोख10 हजार रु असे एकूण 5 लाख 20 हजार,तसेच रुपये 45 हजाराची ऑक्सिजन कॉन्स्टट्रेटर मशीन, सुपूर्द करण्यात आली आहे.उमरी नगरपरिषदेच्या सफाई कामगार आणि अन्य अश्या एकूण 46 कर्मचाऱ्याना प्रत्येकी 5 हजार रु रोख असे एकूण 2 लाख 30 हजार रोख सुपूर्द करण्यात आले आहेत.पोलीस ठाणे उमरी च्या एकूण 45 कर्मचारी व होमगार्ड ह्यांना प्रत्येकी 8 हजार असे एकूण 3 लाख 60 हजार रोख सुपुर्द करण्यात आले आहेत.उमरी येथील ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद,पोलीस ठाणे ह्या तिन्ही विभाग प्रमुखांना रोख रक्कम, एक यंत्र सुपूर्द करण्यात आले असून हे तिन्ही विभाग कर्मचारी स्वतःसाठी अथवा संबंधित विभागाने ठरवून आपापल्या आवश्यकतेनुसार रक्कम खर्च करून रुग्ण व नागरिक कल्याणार्थ देखील वापरू शकतील अशी माहिती देखील विजयआप्पा उत्तरवार,त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री त्यांचे सुपुत्र ओंकार,अरविंद,अजय,अच्युत, व डॉ.आनंद उत्तरवार ह्यांनी दिली.
कोरोना विरुद्ध लढ्यातील लढवय्ये असलेले उमरी ग्रामीण रुग्णालयातील, नगरपरिषद,पोलीस, होमगार्ड ह्या विभागातील मंडळी जीव धोक्यात घालून मानवाच्या जीवित्वाची काळजी घेत असून प्रसंगी जीवनदान देणाऱ्या ह्या सर्वांच्या सेवेत आमचा ही हा खारीचा वाटा असावा असही उत्तरवार कुटुंबीयांनी म्हंटल आहे .सर्व विभागांना दिलेली ही रक्कम स्टाफ व कर्मचार्यांना देण्यासाठी असून ह्याचा विनियोग मात्र कसा करायचा हा अधिकार ह्या सर्व विभागाच्या मर्जीने करावा त्याबद्दल आमची हरकत आणि अट नाही असेही ते म्हणाले.कोरोना ह्या वैश्विक महामारीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सह्यातता निधी साठी देश आणि राज्यात अनेक सरसावले असून उत्तरवार कुटुंबीयांनी मात्र आपल्या उमरी ह्या कर्म भूमी ची सेवा केल्याने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.ह्या सेवे बद्दल आर्यवैश्य समाजातील मंडळी ,उत्तरवार कुटुंबियांचे सर्व आप्तेष्ट, हितचिंतक, सर्व धर्मीय सेवाभावी नागरिक ,महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा सर्वांनी उत्तरवार कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.