परभणी:जनधन,शेतकरी,अपंग,उज्वलासह ईतर लाभार्थ्यांनी विनाशुल्क घ्या ग्राहक सेवा केंद्राचा लाभ-जिल्हाधिकारी


परभणी,दि. ३ एप्रिल , प्रतिनिधी- परभणी शहरासह जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँँका व ईतर बँकावरील गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्राहक सेवा केंद्रांना (एससीपी) मान्यता दिली आहे. या केंद्रावरून जनधन, शेतकरी, अपंग, उज्वला या व ईतर योजनेसाठी विनाशुल्क लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच परभणीतील शाही मस्जीद, स्टेडीयम, अपना कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात या केंद्रावर ग्राहक येत आहेत.
कोरोना साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत, ग्रामीण बँकेचे विविध ठिकाणी 337 ग्राहक सेवा केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रामार्फत 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढणे, 20 हजार रुपये पर्यंत पैसे भरणे, 20 हजार रुपये पर्यंत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरणे या सेवा पुरविण्यात येतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रामार्फत 20 हजार रुपयेपर्यंत पैसे काढणे, 20 हजार रुपयापर्यंत पैसे भरणे व 50 हजार रुपये पर्यंत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरणे या सेवा पुरविण्यात येत आहे. बँकेमार्फत गावनिहाय व दिवस निहाय ग्राहक सेवा केंद्राचे वेळ बँकाकडून घोषित करण्यात येईल. ग्राहक सेवा केंद्रावर (एससीपी) येथील वरील सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे ग्राहकांनी या सेवा केंद्राचा वापर केल्यावर त्यांना बँकेच्या शाखेपर्यंत प्रवास करावा लागणार नाही व त्यांचे काम सोपे होईल. या सेवेचा सर्व खातेदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!