उमरी : प्रशासनाची सतर्कता : बाहेरगावाहून आलेल्या बावीस लोकांना केले बंदिस्त

(संग्रहित छायाचित्र )


उमरी दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी –.लॉकडाऊन काळात सर्वत्र कंपन्याबंद असल्यामुळे तेलंगाणा राज्यातील आदीलाबाद येथील उमरी शहरातील बावीस कामगार तेलंगणातील आदिलाबाद येथून उमरी येथे दाखल झाले होते. बाहेरून आलेल्या या नागरिकांना शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या समोर सुरक्षा व्यवस्तेनुसार त्वरित बंदिस्त करण्यात आल्याची माहिती उमरी नगर पालीकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे.
उमरी शहरातील बावीस नागरिक हे कामानिमित्त तेलंगाना येथील आदिलाबाद येथे कामास गेले होते सध्या कोरोना संसर्गामुळे हे नागरिक मंगळवारी उमरी शहरात दाखल झाल्याची माहिती मिळताच या सर्व नागरिकांना शहरातील गोरठा रोडवरील जलशुद्धीकरण केंद्र समोर त्यांना बंदिस्त करण्यात आले आहे तसेच त्यांची जेवण्याची व इतर समस्या सोडवण्या ची व्यवस्था करण्यात आली असुन त्यांची इतर व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!