लोहा दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी -कोविड-१९मुळे शाळा बंद झाल्यामुळे व लाॕकडाऊन काळातील शिजविलेला नाही असा शालेय पोषण आहार जि.प.के.प्रा.शा.सुगाव ता.लोहा येथे समप्रमाणात गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आला
लॉक डाऊन झाल्यामुळे शाळा बंद आहेत शालेय पोषण आहार शिजवणे बंद आहे त्यामुळे तांदूळ वाटप करण्यात यावा असा सूचना आहेत गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्यात मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यांना सरपंच दिलिप पाटील जाधव ,केंद्रप्रमुख टी.पी.पाटिल ,केंद्रिय मुख्याध्यापक जी.एस.मंगनाळे ,शा.व्य.स. अध्यक्ष गणेश पा.जाधव ,उपाध्यक्ष रामदास पा.जाधव ,आर.जी.तलवारे , किरण राठोड , जयराम पाटील ,हबीब शेख आदींच्या उपस्थित वाटप करण्यात आले.
शाळेतील एकुण विद्यार्थी १०७ पैकी १०२ विद्यार्थी -विद्यार्थीनीना ९६ टक्के वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार समप्रमाणात तांदूळ ,मसुरदाळ,वाटाणा , हरभरा ,मटकी वाटप करण्यात आले.सोशल डिस्टंट ठेवून टप्प्यात वाटप करण्यात आले.