मुदखेड शहरात मुंबई हुन आलेल्या नागरीकांच्या घरी जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी


तपासणी पथकाकडे हेल्थ प्रोटेशन किट नसल्यामुळे जिव धोक्यात ?


मुदखेड दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – मुदखेड शहरात मुंबई सह बाहेर गावाहून आलेल्या नागरीकांच्या आरोग्य तपासणी मुदखेड ग्रामिण रुग्णालयाचे पथकाकडून होत आहे.परंतु जो आरोग्य तपासणी पथक आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्ण ची तपासणी करत आहे त्या पथकाकडे त्यांना हेल्थ प्रोटेशन किट ची गरज आहे. परंतु आरोग्य विभाग व महसूल प्रशासन हे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र मुदखेड शहरात दिसत आहे.
केवळ एकाच मास्कचा रोज धुवून ते घालून शहरात फिरत असताना दिसत आहे.आरोग्य तपासणी पथकांची काळजी घेणे हे प्रशासनाला अत्यंत गरजेचे आहे परंतु प्रशासन या पथकाकडे जानुन बुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
या बाबत महसूल प्रशासन अधिकारी यांना कल्पना दिली असून ग्रामिण रुग्णालयाच्या पथकाकडे विशेष लक्ष देऊन हेल्थ प्रोटेशन किट उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरीक करीत आहेत.
या पथकात डॉ.तळणीकर, डॉ.सावत, मोहण कवळे, प्रदिप कांबळे, आब्दुल सबुरा, शेख.शाहणा कौसर, शेख.ताजीत आली, म.रफीख, यांच्या सह डॉ.अमोल सरसे उपस्थितीत होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!