रुई बु : ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे नष्ट; त्यात कोरोना वायरसच्या भीतीमुळे नागरिक वैतागले


रुई बु. दि. ३ एप्रिल , वार्ताहर – तालुक्यातील रुई बु व रुई परिसरात गेल्या दहा वर्षा पासून मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे नागरिक त्रस्त असून त्यात मोठी भर म्हणून कोरोना वायरसच्या भीतीमुळे नागरिक चांगलेच वैतागले असल्याचे दिसून येत आहे . शेतीचे व ईतर कामे करण्यासाठी कोणी ही घराच्या बाहेर जात नसल्याने नागरिकांवर आर्थिक संकट व खाण्यापिण्याचा प्रश्न उद्धभावला आहे
तालुक्यातील रुई बु व रुई परिसरातील नागरिकाना खात्यातील पैसे आणण्यासाठी नायगाव व ईतर बँकेला जावे लागते परंतु कोणतीच वाहने चालू नसल्यामुळे दुसरीकडे लॉकडाऊन असल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भीतीमुळे कोणीच बाहेर जात नाही यामुळे ग्रामीण भागातील नागरिक म्हणतात निवडणुकीच्या काळात राजकीय मंडळी मत मागण्यासाठी व्यस्त राहतात आणि कोरोना वायरसच्या बाबतीत शासन अथवा राजकीय पुढारी जन जागरन करण्यासाठी कोणी लक्ष देत नाहीत त्यामुळे आता तरी कोरोना वायरस बद्दल जनजागृती करण्यात यावि असे जनतेचे मत आहे

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!