धर्माबाद : शिवा संघटना व पोलीस विभागाच्या वतीने ‘रक्तदान’ शिबिराचे आयोजन


धर्माबाद दि. ३ एप्रिल, तालुका प्रतिनिधी – “कोरोना” ने जगभर थैमान घातले असताना आपल्या देशातील सैनिक, डॉक्टर, पारिचारिका, पोलीस, सफाई कामगार, समाज सेवक हे आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व देशबांधव, भगिनी लढा देत आहेत.
“कोरोना”या रोगाने लॉक डाऊन असल्याने रक्ताचा मोठा तुटवडा पडणार आहे. अशी परिस्थिती राहिली तर मोठे संकट उभे राहणार आहे म्हणून सर्व देश प्रेमी धर्म, जात, पंथ न मानता सामाजिक जाणिवेतून, देशाचा घटक म्हणून देशासाठी रक्त देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या जाणिवेतून येथील” शिवा संघटना धर्माबाद तालुका” व पोलीस स्टेशन धर्माबाद यांच्या संयुक्त पुढाकाराने दिनांक 4 एप्रिल 2020 रोज शनिवारी सकाळी 7-30 वाजता पोलीस स्टेशन धर्माबाद येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
देशासाठी रक्तदान करावे हीच संधी आहे.आपले रक्त कुणाच्या कामासाठी आले तर आपण मोठे भाग्यवान ठरुत . अशा विचाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजिन केले आहे. जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून देशसेवा करावी असे आवाहन पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सोहन माछरे व स्टाफ , शिवा संघटनेचे अध्यक्ष डाॕ. आबासाहेब पाटील बन्नाळीकर व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!