मध्यम वर्गीय परिवाराचे हाल; उधार उसनवारी ही मिळेना
सूर्यकांत सोनखेडकर
नायगावबाजार, दि.३ एप्रिल , – कोरोना वायरस मुळे अखेर जग हादरले. या वायरसची लागण भारतात मोठ्या प्रमाणात होवूनये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु बरोबर लगेच देशात एकवीस दिवसाचे लाॅक डाउन जाहीर केला.या लाॅक डाउनला आणि पंतप्रधान याच्यां आवाहनास देशातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.
लहान मोठे व्यापारी अधिकारी,उद्योजग , शेतकरी कष्टकरी जनता घरात बदिस्त झाली.जीवनावश्यक वस्तू च्या खरेदी व्यतिरीक्त ९० टक्के जनता घराच्या बाहेर पडत नाही हे वास्तव सत्य आहे. हे खरे असले तरी या लाॅक डाउन मुळे कष्टकरी व मध्यम वर्गीय कुटुंबातील घरातील संसाराचे पार कंबरडे मोडले आहे.रोज मजूरी करून आपल्या परिवाराचा गाडा सुखांने हाकनाऱ्या कुटूंब प्रमुखा पुढे लाचाराची जिने आले. हाताला काम नाही, घरात येनारी उत्पन्नाची आवक थांबली.
घरात चार दोन लेकरा बाळाची खाणारी तोडं आणि घरात होते नव्हते ते चार पाच दिवसात संपले . खाण्या पिण्याचे वांदे निर्माण झाले. लेकरा बाळांना काय खाऊ घ्यालावयाचे हा प्रश्न त्याच्यां पुढे निर्माण झाला. कष्टाच्या स्वाभिमानावर जगणारी ही मानस लाचार झाली,काय करावयाचे हे कळायला मार्ग नसताना नायगाव शहर व तालुक्यातील कांही दानशुर मंडळी या बाधंवाच्या मदतीला धावून आली.माजी आ.वसंतराव चव्हाण मित्र मंडळाचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यानां कष्टकरी बाधंवाची अडचन लक्षात आल्याने त्यानीं शहरातील दोन हजार कष्टकरी कुटूंबाला प्रत्येकी पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू व एक किलो खाद्य तेलाचे वाटप केले.चव्हाण परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत १४२ क्विंटल धान्य न पंधरा क्विंटल तेलाचे वाटप केले.
या बरोबरच शंकरनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी वर्दीतला मानव जागा करत आपल्या टिमच्या माध्यमातून नरसी व लगतच्या गावातील कष्टकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तू खाण्या पिण्याचे उपयुक्त साहित्याचे वाटप करत आपल्यातला मानव धर्म जपला.आ.राजेश पवार यांनीही अन्न धान्याचे वाटप करून आपल दानत्व दाखवून दिले.या बरोबरच अनेक दानशुर मंडळी मुळे या गोरगरीब कष्टकरी बाधंवाच्या घरातील उपासमार टळली.
शासनाने महिन्याच्या रेशन बरोबरच प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्याचे जाहीर केल्याने या परिवारा बरोबरच सर्वच वर्गातील नागरिकांना मोफत धान्य वाटपाची धोरण जाहीर करून मोठा दिलासा दिला.
मध्यम वर्गीयाचे मोठे हाल
कष्टकरी वर्गा बरोबरच मध्यमवर्गीय कुटुंबातील मंडळींचीही या लाॅक डाउन काळात चांगलेच हाल होत असताना दिसत आहे.बाप भीक मागू देईना माय जेवू घालीनां अशी या परिवाराची अवस्था झाली आहे.कोणी वाटप करीत असलेले अन्न धान्य पुढे होवून घेता येइना.घरातील होते ते संपले.लाॅक डाउन काळात उधार उसनवारी मिळत नसल्याने या वर्षाची मोठी कुचंबणा होत आहे.दहा दिवस संपले अजूनही दहा दिवस काढायची आहेत.जीवनाचा मोठा संघर्ष या कोरोना च्या माध्यमातून पुढे उभा आहे.कोरोना ला हरविण्यासाठी आणि जिवन जगण्याचा संघर्ष चालू आहे, जिवन हेच संघर्ष ह्या म्हणी प्रमाणे.