माहूर : श्री दत्त शिखर संस्थान कडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९’ साठी ११ लक्ष रुपयांची मदत


श्री क्षेत्र माहूर दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी -राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थान कडून ११ लक्ष रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९’ या नावाने करोनाशी लढण्यासाठी मदत म्हणून श्री दत्त शिखर संस्थांनचे अध्यक्ष तथा महंत प.पू.श्री मधुसूदन जी भारती गुरु अच्चुत भारती महाराज यांच्या वतीने कार्यालयईन अधिक्षक देशमुख यांच्या हस्ते तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना देण्यात आला.
देशभरात व राज्यात करोना सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकार ला मदत करण्यासाठी अनेक दानशूर पुढे येत आहे. राज्यातील अनेक मंदिर संस्थानाने मदत जाहीर केल्यानंतर माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान ही मदतीसाठी पुढे आले असून श्री दत्त शिखर संस्थांनचे महंत प.पू.श्री मधुसूदन जी भारती गुरु अच्चुत भारती महाराज व सर्व विश्वस्त यांच्या वतीने श्री दत्त शिखर संस्थान कडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लक्ष रुपयाचा धनादेश दि. 31 रोजी दत्त शिखर संस्थांन येथे देण्यात आला. यावेळी संस्थान चे कर्मचारी उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!