उमरी: शहरातील ”जनता बार” फोडुन ७० हजार रु ची दारू लंपास


श्वानपथकास केले पाचारण


उमरी दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले असुन त्या अनुषंगाने लॉक आऊट च्या काळात देशी दारु, बिअर बार हातभट्टी, दारुची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांची पंचायत होत असुन अशातच उमरी शहरातील बस स्थानका च्या मागे असलेल्या जनता बार च्या पाठीमागील दाराची कडी तोडून चोरटयांनी आत प्रवेश करुन ७०,००० रुपाय च्या बिअर्स व विदेशी दारू चोरुन नेल्याची घटना ३१ मार्च रोजी घडली. सकाळी जनता बार फोडलेली माहीती बार च्या मैनेजरला दिल्याने उघडकीस आली असुन या संदर्भात श्वान पथकला पाचारण करण्यात आले होते श्वानला मुख्य रस्त्यावरून जनता बार पर्यंत फिरविण्यात आले अज्ञात चोरटयां च्या विरोधात उमरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला .
या संदर्भात जनता बार चे मैनेजर साहेबराव शेषेराव बोडके यांनी दिलेल्या तक्रारी वरुन उमरी पो स्टै मध्ये तक्रार दिल्याने अज्ञान्यात चोरटयांन च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास जमादार एस ए गवलवाड हे करीत आहे .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!