धर्माबाद दि. २ एप्रिल तालुका प्रतिनिधी – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला तेव्हापासुन शहर लॉक डाऊन केल्याने शहरातील छोटे मोठे रोजगार बंद करण्यात आले त्यामुळे रोज मजूरी करणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली येणार हे लक्षात घेऊन येथील माहेश्वरी (मारवाडी)समाजाची युवा शक्ती एकवटली आहे . गरजूंना आवश्यक सोई सुविधा पुरवण्यासाठी कुठलाही गाजावाजा वा दिखावा न करता आठ दिवसापासून दररोज ५० किलो तांदळाचा पुलाव करून गोरगरीब जनतेला वाटप करीत आहे.
कोणत्याही कठिण प्रसंगी अथवा दुष्काळ प्रसंगी येथील मारवाडी समाज हा नेहमीच पुढे असतो.अन्नदान हा तर त्यांचा गुणधर्म आहेच पण रक्तदान शिबीर ही आयोजित करतात. अशा कार्यक्रमात येथील उद्योगपती सुबोध काकाणी पुढाकार घेतात .या वेळी स्वतः एकटे 100 किलो तांंदुळाची खिचडी करुन भटक्या व गरीबांना घरपोच वाटप करीतआहेत .
या माहेश्वरी तरुण मंडळात शुभम सारडा, रमन झंवर, हरीश झंवर, पंडित इनानी, कपिल सारडा, महेश सारडा, प्रणय पहाडे, आनंद राठी, पंकज कालिया, पवन मंत्री, व मुकुंद मालू आधी यंग ब्रिगेडने संघटित होऊन सुनियोजित पद्धतीने गरजू लोकांना कुठलाही दिखावा न करता अत्यावश्यक सेवा करीतआहेत. गरीब जनता धन्यवाद देत आहे .