बिलोली : संचारबंदी काळात प्रशासनास सहकार्य न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार.- तहसिलदार विक्रम राजपूत

बिलोली दि. २ एप्रिल तालुका प्रतिनिधी – देशासह राज्यातील काही भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आले असले आहेत.आपल्या तालुक्यात कोरोनाचा एकही पाँझिटीव्ह रूग्ण आढळून आला नाही तरी पण प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वञ संचार बंदी करण्यात आली आहे.संचार बंदीच्या काळात प्रशासनास सहकार्य न करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बिलोलीचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी दिला आहे. कोरोना विषाणूने देशासह राज्यात धमाकूळ घातला आहे.राज्यातील काही भागांमध्ये या रोगाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असून या रोगाचा अन्य भागात प्रसार होऊनये या उद्देशाने खबरादारीचा उपाय म्हणून शासनाने सर्वत्र संचार बंदी केली आहे.संचार बंदी असली तरी अत्यावश्यक सेवेसाठी या संचार बंदीत शिथिलता देण्यात आली आहे.माञ याचा काही लोक गैरफायदा घेऊन विनाकारण फिरत आहेत.संचार बंदी काळात प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजाग्रती करण्यात येत असून नागरिकांना घरातच थांबण्याचे अवाहन करण्यात येत आहे.माञ काही नागरिक प्रशासनाच्या अवाहनाकडे दुर्लक्ष करून विनाकारण बाहेर फिरत आसल्याचे निदर्शनास येत आहे.आता अशा नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला असून कोरोना बाधित शहरामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना होम काँरंटाईन करण्यात येत असून काही गंभीर अवस्था उद्भवल्यास त्यांना नांदेड येथे उपचारास पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.कोरोनामुळे उद्भवलेल्या या गंभीर परिस्थीतीमुळे हातावर पोट असलेल्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून अशांना धान्य पुरविण्याची प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येत असून तालुक्यातील समाजसेवकांनीही अशा लोकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज असून प्रशासनाच्या मदतीने मदत कार्य केल्यास खऱ्या गरजूपर्यंत मदत पोंहचण्यास मदत होईल त्यामुळे मदत करू इच्छीणाऱ्या समाज सेवक व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन तहसिलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!