मुदखेड दि.,२ एप्रिल तालुका प्रतिनिधी – मुुुदखेड तालुक्यातील सरेगाव येथे कोरोना या विषानुवर मात करण्यासाठी सरेगावच्या उपसरपंच माधव पांचाळ यांनी स्वत: पाटीवर पिचकारी घेऊन गावात सेनटाईज ने फवारणी केली. या संकल्पनेचा संदेश नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद चे नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य, व ग्रामीण भागातील संरपच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी असे उपक्रम आपल्या नगरीत गावात राबवावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
संपूर्ण गावामध्ये सेनटाईज औषधा ची फवारनी करतांना शिवसेनेचे मुदखेड तालुका उपप्रमुख तथा सरेगावचे उपसरपंच माधव पांचाळ यांच्या सह सरपंच जिवनराव कळणे, शिवाजी कळणे, वामन कळणे, यांनी सहकार्य केले आहे.