धर्माबाद दि. २ एप्रिल तालुका प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी येथील सोन्या चांदीचे व्यापारी गिरीष पांपटवार यांनी आपल्या व मुलींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ लाख ११ हजार रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस बुधवारी दिला आहे.
शहरातील सोन्या चांदीचे सुप्रसिद्ध व्यापारी गिरीष पांपटवार व त्यांची कन्या कु.अक्षिता गिरीष पांपटवार हिचा दि.१ एप्रिल रोजी एकाच दिवशी मुलीचा व वडीलांचा वाढदिवस हा योगा योग असून वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस गिरीष पांपटवार यांनी एक लाख अकरा हजारांचा धनादेश येथील तहसिलदार डि.एन.शिंदे यांना दिले आहे.
यावेळी उद्योगपती सुबोध काकाणी, गणेश मेडिकल हाॅलचे मालक रामचंद्र पाटील बाळापुरकर, चंद्रकांत पाटील बाळापूरकर, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, संतोष पांपटवार, गोविंद झंवर, बहुभाषिक पञकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार संजय कदम, संतोष लुहाडे यांची उपस्थिती होती.सदरील कार्यक्रम गणेश मेडिकल हाॅल मध्ये बुधवारी दुपारी घेण्यात आले आहे.आपल्या मुला, मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी लाखों रुपयांची उधळपट्टी केली असल्याचे चित्र पाहत आलो आहे.परंतु वाढदिवस साजरा न करता कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी गिरीष पांपटवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस वरील रक्कमेचा धनादेश दिल्यामुळे त्यांचे कौतुक जनतेतून होत आहे.