बिलोली : विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

बिलोली दि. १ एप्रिल तालुका प्रतिनिधी – बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील युवक महेश नारायण राखे वय (22)याचा शॉक लागून मृत्यू झाल्याने त्याला नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास लाईट गेल्यामुळे महेश गच्चीवर जाऊन वायरचे काम करीत होता अचानक लाईट आल्याने विद्युत प्रवाहाचा स्पर्श त्याच्या शरीराला झाल्याने तो जागीच गतप्राण कुटुंबियांनानी तात्काळ त्याला उपचारासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले आहे. अत्यंत मनमिळावू असलेल्या महेशचे लग्न गतवर्षीच झाले होते. त्याच्या पश्चत आई वडील,भाऊ,बहीण आजोबा असा परिवार आहे

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!