भोकर : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दिलीप वाघमारेंनी दिला गरीबांना मदतीचा हात


१२२ कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप


भोकर दि. १ एप्रिल तालुका प्रतिनिधी – लाँकडाऊन काळात हैराण झालेल्या शहरातील अनेक कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करून भोकर नगरपरीषदेतील कर्मचारी दिलीप वाघमारे, नगरसेविका सौ. सुवर्णा वाघमारे यांनी मदतीचा हात दिला आहे.
भोकर ग्रामपंचायत असतानापासून दिलीप वाघमारे यांच्याकडे शहरातील स्वच्छता विभागाची जबाबदारी आहे. आपले कर्तव्य पार पाडत असतानाच दुर्लक्षित असलेल्यांना नेहमीच सहकार्य करण्याची भुमिका वाघमारे यांची राहिलेली आहे. मग स्वखर्चाने बेवारस असलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे असो किंवा एखाद्या गरीब कुटुंबातील मुला-मुलीचे लग्न असो अशा विविध कार्यक्रमासाठी ते नेहमी पुढाकार घेवून सामाजिक कार्य करतात. सध्या करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाँकडाऊन करण्यात आले. सर्व बाजारपेठ बंद असल्याने गरीबांच्या हाताला काम नाही. अशा गरीब माणसांना मदत करावी या उद्देशाने वाघमारे परीवाराने अन्नधान्याचे वाटप करून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. शहरातील १२२कुटुंबांना त्यांनी अन्नधान्याचे वाटप केल्याने अनेक कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.

अनेक सामाजिक संघटनांची मदत
लाँकडाऊन काळात कोणीही उपाशी झोपू नये यासाठी शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेवून परराज्यातून कामासाठी भोकर येथे आलेल्या उमरी, बटाळा रस्त्यावर पाल टाकून आसलेल्या अनेक गरीब कुटुंबांना अन्नधान्य, शिजवलेले अन्न देवून मदत केली आहे.तसेच बाहेरगावचे भोकर येथे कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी, अरोग्य विभागाचे कर्मचारी यांनाही सामाजिक संघटनांनी डब्बा पुरविण्याचे काम करीत आहेत. यात भोकर न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश शेख मुजीब व त्यांचे कर्मचारी, सावली प्रतिष्ठान,सेवा समर्पण परिवार, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते , व्यापारी असोसिएशन, आनंद डांगे आणि साईनाथ रेड्डी कोपलवाड यांचा मित्रपरिवार यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी यासाठी पुढाकार

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!