कामठा बु. गावात हायपोक्लोराइड ची फवारणी ; मास्क व साबणाचे हि वाटप


कामठा बु . दि. १ एप्रिल वार्ताहर – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत कामठा बु यांच्या पुढाकाराने गावात हायपोक्लोराइड सोलुशन तयार करून फवारणी करण्यात आली व गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे व त्याच बरोबर गावातील सर्व कुटुंबातील सदस्य यांना मोफत मास्क व हात धुणे साठी एक साबण वाटप करण्यात आले आहे .
आज दिनांक १/४/२०२० रोजी गावातील सरपंच शिवलिंग स्वामी, उपसरपंच प्रभु पाटील, सोसायटी चेअरमन सोमवारे, पंचायत समिती अर्धापूर च्या माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य मंगलताई स्वामी ,रामकिशन दासे , पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. आर. मोटरवार,हि. एम. मुडकर, डॉ. एस. पी. गोखले, आरोग्य उपकेंद्र कामठा समुदाय आरोग्य अधिकारी डॉ बनसोड , ग्रामविकास अधिकारी यु. एम. देशमुख,,काळे सिस्टर, खुळे सिस्टर, , आरोग्य कर्मचारी माकु, तलाठी भूरेवार ,अंगणवाडी सेविका योजना केदारे,नंदा कांबळे, संगिता दासे, आशा , ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी गव्हाणे आदींची उपस्थिती होती .
कामठा गावात एकुण १२८८ कुटुंब आहे ६३९८ लोकसंख्या आहे या सर्वांचे कोरोना पासून आरोग्य निरोगी राहावे यासाठी स्वत: ग्रामपंचायत ने पुढाकार घेणारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारी ग्रामपंचायत ठरली आहे त्या मुळे गावातील लोकांमध्ये मनोधैर्य वाढले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!