देगलूरात संचारबंदीचे उल्लंघन ; अकरा जणांवर कारवाई


देगलूर दि. १ एप्रिल तालुका प्रतिनिधी – शहरात विनाकारण फिरून संचार बंदीचा उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवार दि. 1 एप्रिल रोजी अकरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाची सध्या संक्रमणावस्था असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये असे प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही याकडे अनेकांकडून डोळेझाक करून साठे चौक, जुना पेट्रोल पंप, नरंगल रोड , नवीन बसस्थानक आदी परिसरात हुल्लडबाजी करून संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकरा जणा विरुद्ध पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सिंह ठाकुर , दिपक जोगे ,कंधारे, लुंगारे , मलदेवडे, एस. कदम यांनी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!