मुख्याधिकारी यांच्या कामगिरीचे शहरवासीयांनी केले स्वागत
लोहा दि. १ एप्रिल तालुका प्रतिनिधी – लोहा नगरपालिकेने मुख्य रस्त्यावरील गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या भाजी मंडई चे अतिक्रमण आज बुधवारी दुपारी हटविले .मुख्य रस्त्याने अनेक वर्षा नंतर मोकळा श्वास घेतला .मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांनी केलेल्या धाडसी कारवाई चे शहरवासीयांनी जोरदार स्वागत केले आहे
लोहा शहरात मुख्य रस्त्यावर अनेक वर्षापासून भाजी पाला विक्रेत्यांनी शहराच्या मुख्य रस्त्यावर ( नॅशनल हायवे) ठाण मांडले होते.. बेरोजगारी च्या नावाखाली रस्त्यावर रहदारीला अडथळा होत होता परंतु ही भाजी मंडई स्थलांतरित करण्याचा निर्णय होत नव्हता व झाला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती.. त्यामुळे लातूर कडे व नांदेड कडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला पादचारी यांना मोठा त्रास होत होता
नॅशनल हायवेवर असलेली ही भाजी मंडई शहरवासीयांसाठी वाहतूकदारां साठी अडचणीची ठरली होती .. कोरोना च्या टाळे बंदीनंतर शहरात कलम 144 लागू करण्यात आले. या काळात ‘सोशल डिस्टन्स’ चे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश तालुका प्रशासनाने दिले आहेत नगरपालिका प्रशासनाने मागील आठवड्यात भाजी मंडई पाच ठिकाणी बसविण्याचे निर्देश दिले होते तदनंतर ही भाजीपाला विक्रेते नेमून दिलेल्या ठिकाणी सक्तीने बसविण्यात आले . रस्त्यावरच गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या भाजी मंडई साठी उभारलेले अनाधिकृत शेड आज बुधवारी मुख्याधिकारी डॉ. सुकलवाड यांनी स्वतः घटनास्थळावर उभे राहून हटविले . यासाठी कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, बळीराम पवार, माधव पवार, किसन दांगटे, फरकांडे, भातलवंडे,सोमनाथ केंद्रे, गोविंद काळे, नळगे, पारेकर यासह सर्वच कर्मचारी यांनी हे अतिक्रमण काढले ..अनेक वर्षांनंतर मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला
तत्कालीन नगराध्यक्ष किरण वटटमवार उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल यांच्या काळात काही दिवस मोंढा भागात ही भाजी मंडई स्थलांतरित केली होती पण पुन्हा जैसेथे झाली. मुख्याधिकारी डॉ सुकलवाड यांच्या धाडसी निर्णयाचे शहरातील लोकांनी स्वागत केले आहे.
पोलिसांचीही १४५ वाहनावर कार्यवाही
पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी गेल्या दोन दिवसां पासून विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्या दुचाकी ,ऑटोरिक्षा, अन्य वाहनावर कडक कार्यवाहीची मोहीम हाती घेतले त्यामुळे १४५ वाहन धारकां विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे