कंधार मधील भटक्या समाजाला शिवसेनेच्या वतीने धान्याचे वाटप

कंधार, दि.१ एप्रिल तालुका प्रतिनिधी- गावो गावी फिरुन आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या कंधार मधील भटक्या समाजावर लॉक डाउन मुळे उपासमारीची वेळ आली आहे.अशा गरिब कुटुंबाना शिवसेने धान्याचे वाटप केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गोर गरीब कुटुंबांना धान्याचे वाटप करीत असल्याचे बाळासाहेब कऱ्हाळे यांनी सांगितले. कोरोना विषाणूस रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोना पासुन वाचवण्यासाठी सध्यातरी लॉक डाऊन हा एकमेव पर्याय आहे. परंतु या लॉक डाऊन हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गावो गावी फिरून पोट भरणारा भटक्या – विमुक्त समाजाचे अनेक कुटुंब कंधार शहरात पाली टाकून राहतात. अशा गरजु कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने धान्याचे वाटप करण्यात आले. भटक्या-विमुक्तांच्या पालीवर जाऊन शिवसेनेचे युवा नेते बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांच्या वतीने डाळ, साखर, चहापत्ती , गोडेतेल तांदूळ, मुरमुरे यांचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक गणेश कुंटेवार नगरसेवक अरुण बोधनकर, पंचायत समितीचे माजी सभापती पंडितराव देवकांबळे, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, सुरेश पाटील हिलाल, लोहा तालुका प्रमुख संजय पाटील ढाले, राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे युवा नेते अंगद केंद्रे, नागोराव पाटील शिरसाट, महेंद्र पाटील तेलंग यांची उपस्थिती होती.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!