पूर्णा : लॉक आऊट काळात गरिबांचे पोलीस बनले देवदूत


पूर्णा दि. १ एप्रिल तालुका प्रतिनिधी – शहरातील गोरगरीब वसाहतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब रोजंदारी मजूर ,शेतमजूर , हातावर पोट असणारे फेरीवाले यांच्यावर लॉकडाऊन संचारबंदी मुळे काम नसल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली असतांना मंगळवारीपोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा मदतीला धावून आला अचानक आलेल्या या पोलीस ताफ्यामुळे काही काळ भेदरलेल्या या उपाशी गोरगरीबांना जेव्हा कळाले की पोलीस लोकं स्वतः आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यास आले तेव्हा मात्र यातील अनेकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले यावेळी पुर्णा परभणी पोलीस प्रशासनाने या गोरगरीबांना स्वतःच्या खर्चातून मसालेभात व बिस्कीटाचे वाटप केले.पोलीस प्रशासनाने जोपासलेली मानुसकी पाहून या गोरगरीबांना खाकी वर्दीत जनुकाही देवदुतच मदतीला धावून आले अशी भावना त्यांच्या मनात उत्पन्न झाली .पूर्णा पोलीसांच्या या कौतुकास्पद कार्याला बघून सहजत तोंडातून परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी बोलताना सांगितले की पोलीस कर्मचारी गरिबांना जेवण पाण्याची बाटली देत आहे परभणी जिल्ह्यात पोलिसांनी कामगिरी केल्याबद्दल नागरिकांमध्ये कौतुक करत आहेत परभणी येथील कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एपीआय विशाल भातरे यांनी दर्गा रोडवर गोरगरिबांना पाण्याची बॉटल, जेवण दिले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!