हदगाव : दिव्यांगांना वस्तू सुविधा पुरविण्याचे आयुक्तांचे आदेश असतानाही शासनाकडून हरताळ


हदगाव दि. १ एप्रिल , तालुका प्रतिनिधी -दिव्यांग व्यक्तीला शासनाने संचार बंदीच्या काळात भयंकर महामारी कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी दिव्यांगांला अपंग कल्याण आयुक्तालय पुणेच्या आदेशा मार्फत दररोज लागणारी सर्व शासकिय सुविधांचा व जिवनावश्यक वस्तुंची किट तात्काळ मिळण्याकरीता दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी.उप विभागीय अधिकारी हदगांव,तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना इ मेल व्दारे हदगांव शहरातील 60 ते 70 दिव्यांग व्यक्तीच्या नाव व दिव्यांग प्रकार आणि टक्केवारी माहिती यादीसह निवेदन देण्यात आले आहे.
कोरोणा विषांणुच्या संचार बंदीच्या काळात दिव्यांगांला मिळणारी सर्व शासकिय सुविधांचा व जिवनावश्यक वस्तुंची किट म्हणजेच अन्न धान्य, कडधान्य, डाळी, तेल, तांदुळ, साखर, सनिटायझर, साबण, मास्क, रुमाल, डेटौल, फिनेल आणि 2 वेळेचे जेवणाचा डब्बा/नास्टा इत्यादी साधारणपणे संचार बंदीत पुरेल एवढे सामान दिव्यांग व्यक्तीला तात्काळ घरपोच द्यावे. व तसेच दिव्यांग व्यक्तीला दरमहा मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अतिरिक्त त्वरित मानधन द्यावी अशी सुस्पष्ट सुचना मा.अपंग कल्याण आयुक्त, पुणे यांनी दिनांक 26/03/2020 रोजीच्या पञाव्दारे सर्व विभागीय आयुक्त व तसेच सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे.पण शासनाने या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. व तसेच त्या आदेश पञाची जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर अंमलबजावणी होत नसल्याची खंत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी केली. संचार बंदीतही दिव्यांगांसाठी समीर पटेल हे सतत दिवस राञ झटून सुध्दा शासन व लोकप्रतिनिधीने दिव्यांगांकडे पाठ फिरवली आहे. व तसेच या अतिप्रसंगाच्या काळात शासन निर्णय व शासन आदेश असुन सुद्धा शासनाकडुन दिव्यांगांला कोणतीही मदत व सुविधा मिळत नसल्याने दिव्यांग व्यक्तीवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने त्वरीत दिव्यांग व्यक्तीच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी निवेदनात दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी केली आहे…

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!