किनवट दि. ३१ मार्च तालुका प्रतिनिधी – तालुक्यातील गणेशपूर व कमठाला शिवारातील आखाड्यावर बांधलेल्या २ गोऱ्हयांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.तर १ गोऱ्हा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दि.३० रोजी घडली.
तालुक्यातील गणेशपूर शिवारात रामराव आत्राम यांच्या शेतातील आखाड्यावर गुरे आहेत.सोमवारी बिबट्या वाघाने आखाड्यावरील जनावरांपैकी १ वर्षाच्या एका गोऱ्हयावर हल्ला चढवून त्याला ठार केले.दुसऱ्या घटनेत कमठाला शिवारातील परमेश्वर भोयर यांच्या शिवारातील आखाड्यावर असलेल्या १ वर्ष वयाच्या २ गोऱ्हयांवर हल्ला चढवून बिबट्याने त्यांना ठार केले.तर एका गोऱ्हयाला गंभीर जखमी केले.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किसन खंदारे यांच्यासह वन कर्मचारी माजाळकर,सांगळे,के.जी.गायकवाड,संभाजी घोरबांड,अरुण चुकलवार, दुर्गा डालके,बी.व्ही.आवळे, दांडेगावकर,मौलाना आदींनी दोन्ही घटनास्थळांना भेटी देऊन पंचनामा केला.