शिराढोण ग्रामपंचायत च्या वतीने जंतूनाशक फवारणी


शिराढोण दि. ३१ मार्च , वार्ताहर –

कोरोना व्हायरस महाभयंकर विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी प्राथमीक खबरदारी म्हणून दि . 27 रोजी शिराढोण येथे ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच खुशाल पाटील पांडागळे व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौडम यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लहान मोठ्या नाल्यावर जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली.
कोरोना संसर्गजन्य रोगांचा शिराढोण येथे ससर्ग होनार नाहि यासाठी पुणे , मुंबई , व आदि शहरातून आलेल्या व्यक्तीने शेतामध्येच किंवा घरामध्येच पंधरा दिवस रहावे . लाॅकडाउनचे पालन करा.अत्यअवषक कामासाठी बाहेर नीघत असताल तर एक मीटर चे अंतर ठेवा. पुणे , मुंबई ,सांगली, व आदि जिल्ह्यातून आलेल्यानी तपासणी करून घ्यावे. मोटरसायकलवर डबल किंवा टिबल फिरु नका.चौकामध्ये गप्पा मारत बसुनका . किराणा व मेडिकल वाल्यांनी ग्राहकां ग्राहकामध्ये एक मीटर चे अंतर ठेवा असे वेळोवेळी आवाहन ग्रामपंचायत येथून लाऊडस्पीकर ने व गावामध्ये फिरुन उपसरपंच खुशाल पाटील पांडागळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!