अर्धापूर: कोरोनाच्या धर्तीवर देशमुख कुटुंबियांचा एक अनोखा अविस्मरणीय वाढदिवस…..!

नातीच्या पहिल्याच वाढदिवसाचा निधी राष्ट्राला अर्पण

नागोराव भांगे पाटील

अर्धापूर, दि.३१ मार्च, : कोरोनाच्या आपत्तीमुळे अर्धापूर येथील कुटुंबाने वाढदिवसांचा कार्यक्रम रद्द केला. या कार्यक्रमावर होणारा खर्च प्रधानमंत्री मदत निधीला देण्यात आला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाची जवळपास ५१ हजार रुपये रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला देऊन एक चांगला आदर्श पुढे ठेवला आहे. सध्या संबंध जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊन मुळे ठरलेले लग्न पुढे ढकलली आहेत. तसेच मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकल्या जात आहेत. कोरोनाच्या सावटामुळे एक मोठे संकट विश्वात निर्माण झाले आहे. देशात या संकटाच्या निवारणासाठी नेत्या पासून अभिनेत्यापर्यंत तर मोठ्या उद्योगपती पासून गरीब नागरीक आपल्या परीने योगदान देत आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरच्या धर्मराज देशमुख यांच्या कु.ओजस्विता विराज देशमुख या आपल्या नातीचा आज पहिला वाढदिवस आहे, पण देशमुख कुटुंबाने आपल्या लेकीचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला. तिच्या वाढदिवसासाठी खर्च होणारी ५१ हजार रुपये रक्कम बँकेत जाऊन प्रधानमंत्री मदत निधीत जमा केली आहे. कोरोनामुळे देशभरात अनेक सोहळे रद्द झाले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एका कार्यक्रमाचा खर्च टाळून मदत देण्याची संकल्पना पुढे आल्यामुळे अनेक हात पुढे येतील अशी अपेक्षा धर्मराज देशमुख यांनी व्यक्त केली आहे. इतर दानशूर नागरीकांनी देखील या आपत्तीत पुढे येऊन अशा संकटात मदत करावी असे आवाहन देशमुख कुटुंबाने केल आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून रक्कम केली जमा…! अर्धापूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून चेकद्वारे पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात आली. यावेळी शाखाव्यवस्थापक बालाजी बास्टेवाड, मंगेश गावंडे, माजी जि.प.सदस्य धर्मराज देशमुख, अर्धापूर नगरपंचायत गटनेते अँड.किशोर देशमुख, विराज देशमुख, नागोराव भांगे, सखाराम क्षीरसागर, गोविंद टेकाळे, अजित गट्टाणी, प्रफुल्ल मोटरवार आदी उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!