धर्माबाद दि. ३१ मार्च तालुका प्रतिनिधी – शहरातील व ग्रामीण भागातील हातावर काम करुन पोट भरवणारे ,गाव कुसाबाहेर असणारे ,पाली टाकून राहणारे गिसडी, वासुदेव, जडीबुटी विकणारे, भंगार लोखंड वेचून विकणारे, आणि विठ भठ्ठीवर काम करणाऱ्या समाजातील ३० कुटुंबांना पंधरा दिवसांचे धान्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा,व व्यापा-र्याच्या वतीने दि. ३१ मार्च रोजी घरपोच दिले आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार, मराठी पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष जी.पी.मिसाळे, पत्रकार लक्ष्मण तुरेराव, भास्कर रेडी,बाबु पाटील नरवाडे, सुदर्शन पोतगंटीवार, गोरखनाथ नुतीवाड,पोतन्ना बोडकेकर, संतोष जाधव आदींच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.