किनाळा: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतिने सर्वत्र जंतूनाशक फवारनी


किनाळा दि. ३१ मार्च वार्ताहर

देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या महामारी आजाराने अनेक नागरीक भयभीत झाले असल्याने कोरोणा विशानुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी किनाळा तालुका बिलोली येथील ग्रामपंचायतीच्या वतिने गावातील सर्व परिसरात दि.31मार्च रोजी जंतूनाशक फवारनी करण्यात आली .
दि.30 रोजी नायगाव येथील एक संशयित रूग्ण आढळून आल्यामुळे सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरले असल्याने किनाळा ग्रामपंचायतीच्या वतिने येथील सरपंच सौ नमृताताई रघुनाथ गायकवाड, ग्रामसेवक वडजे व्ही. व्ही.,बालाजी पाटील भोसले, शिवाजी पाटील मोहीते, यादवराव राखे, दिलीप मोरे, माजी सरपंच जयवंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या वतिने गावातील सर्व परिसरात दि. 31 मार्च रोजी जंतूनाशक फवारनी करून गावातील नागरिकांना कोणीही विनाकारण घराबाहेर पडु नका, आपल्या तोंडाला नेहमी रूमाल बांधावे ,बाहेर कुठेही गर्दीत जाउ नये, गावातील अतीआवश्यक असलेल्या ठिकठिकाणी एकमेकांपासून तिन फुट अंतरावर दुर दुर उभे रहावे, अतीआवश्यक कामाशिवाय बाहेर गावी जाउ नये, देशासाठी देशाचे पंतप्रधान करित असलेल्या प्रयत्नाला प्रतिसाद देत देशातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी आणि पोलीस प्रशासना कडुन करण्यात येत असलेल्या कार्याला कुठेही अळथळा येवू नये यासाठी सर्व नागरीकांनी लाॅकडाउनच्या काळात बाहेर गावहुन आलेल्या नाकरीकांनी देखील घरातच थांबुन प्रशासनाला मदत करावे असे आवाहन केले.
किनाळा येथे सर्वत्र जंतूनाशक फवारनी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी रामेश्र्वर गायकवाड, संभाजी गायकवाड, हनमंत गायकवाड, पंढरी गायकवाड, लालू गायकवाड, गजानन गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!