बाहेर फिरणाऱ्या तरुणांना हटकले ; सरपंचास दगडाने मारहाण

 
शिरपूर दि. ३० मार्च तालुका प्रतिनिधी – तालुक्यातील अजंदे येथे लॉकडाउनमध्ये बाहेर फिरणाऱ्या तरुणांना हटकल्यामुळे सरपंचास मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून जखमी सरपंचास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर घटना सोमवारी बारा ते एकच्या दरम्यान घडली. यावेळी पाटील यांच्या डोक्यात आणि पाठीत दगडाने वार करण्यात आले आहेत. मारहाणीत पाटील यांना जबर दुखापत झाली आहे. सध्या त्यांना शिरपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लोकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागातही या लॉकडाउनचे पालण करण्यात येते. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, पोलिस पाटील ही मंडळी लोकांवर लक्ष ठेवून आहे .जीवनावश्यक वस्तुंसाठी दुकाने उघडी आहेत, मात्र तरीही गावातील काही टवाळखोर पोरं समूहाने बसताना दिसत आहे. यावेळी तालुक्यातील अजंता येथील सरपंच राजेंद्र पाटील यांनी गावात समुहाने बसणाऱ्या युवकांना हटकले असता त्यातील काही युवकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!