कंधार: खादी व ग्रामोद्योगाच्या बेरोजगार कामगारांना ईश्वरराव भोसीकर यांच्यावतीने अन्न धान्य वाटप


कंधार दि.३० मार्च तालुका प्रतिनिधी – लॉक डाउन मुळे हातावर पोट असलेले अनेक कामगार, मजूरदार बेरोजगार झाले असल्याने त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या कंधार शाळेतील खादी कारखान्यातील कामगारावर उपासमारीची वेळ आली असताना मराठवाडा खादी समितिचे सचिव, माजी आ. ईश्वरराव भोसीकर यांनी त्यांना अन्नधान्य देऊन मदतीचा हात दिला.
यावेळी कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, प्रा. राजेंद्र भोसीकर, माजी जि. प. सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर, सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, शिवराम कीडे आदींची उपस्थिती होती. कोरोना विषाणु ने जगभर धमाकुळ घातला असून भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्रात दररोज रुग्ण संख्येत भर पडत आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये लॉक डाउन चा निर्णय घेण्यात आला यातून हातावर पोट असणारे अनेक कामगार मजूरदार छोटे व्यापारी शेतकरी बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे भोसीकर कुटुंबियांच्या वतीने कंधार शहरांमध्ये गोर गरीबाना अन्य धान्य वाटप केले जात आहे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी बेरोजगार कुटुंबांना अन्नधान्य देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर,व पोलीस निरीक्षक जाधव यांनी कंधार च्या जनतेला घाबरून न जाता कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अत्यंत धैर्यने कोरोना विषाणूचा खंबीरपणे मुकाबला करण्याचे आवाहन केले तसेच स्वतःची काळजी घेताना घरामध्येच रहा बाहेर पडूनका अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत असताना सुरक्षित अंतर बाळगा त्याचबरोबर वेळोवेळी हैंडवाश, साबण ने हात धुने, मास्क वापरणे, गर्दी टाळने, सर्दी खोकला ताप लक्षण आढळल्यास तत्काल नजीकच्या दवाखान्यात दाखवण्याचे आवाहन माजी आमदार भोसीकर यांनी केले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!