‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरजु कुटुंबांना भोसीकर दांम्पत्या कडुन अन्नधान्य वाटप

कंधार, दि.२७ तालुका प्रतिनिधी -कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जगामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असताना भारतामध्ये देखील या विषाणु मुळे मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असून यामुळे शासनातर्फे खबरदारी चा उपाय म्हणून लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे अनेक उद्योग धंदे, कारखाने, छोटे-मोठे व्यवसाय, उद्योग, मजूरी, बंद झाल्यामुळे हातावर पोट असणारे अनेक मजूरदार, कामगार, बेकार झाल्यामुळे तांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंधार शहरातील आपल्या घरा शेजारील २५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु अन्य धान्य देवून दिलासा देण्याचा एक छोटासा प्रयत्न जिल्हा कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर या दाम्पत्यांनी केला आहे.
कोरोना विषाणु च्या वाढत्या प्रदुर्भावामुळे हातावर पोट असणारे अनेक कामगार बेरोजगार झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे यासाठी शासनाच्यावतीने सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याचे आव्हान केले जात आहे याच आवाहनाला प्रतिसाद देत आज कंधार येथे आपल्या घरा शेजारील छोटी गल्ली येतील २५ कुटुंबांना अन्नधान्य व भाजीपल्या साठी आर्थीक मदत संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यानी दिली याप्रसंगी कंधार व लोहा तालुक्यातील सर्व जनतेला त्यांनी आवाहन केले की विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करून आपण घरातच राहावे आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी व या राष्ट्रीय आपत्तीत सर्वांनी मिळून मुकाबला करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!