भोकर शहरातील व्यापारी अंतर ठेवून करत आहेत मालाची विक्री

भोकर दि २७ मार्च तालुका प्रतिनिधी – कोरोना व्हायरसचा संसर्ग होवु नये यासाठी शहरातील अनेक व्यापारी आणि नागरीक दक्षता घेत नियम पाळताना दिसत आहेत. दुकानासमोर काही अंतरावर टाकलेल्या राऊंडमध्ये ग्राहक उभे टाकून सामानाची खरेदी करताना दिसत आहेत.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत लाँकडाऊन करण्यात आले. सुरवातीला दिलेले नियम पालन करीत नसल्याचे दिसून आले. मात्र प्रसारमाध्यमातून होणारी जनजागृती आणि गर्दी केली तर करोनाचा व्हायरस कशापध्दतीने पसरू शकतो. याची माहिती लक्षात येताच विक्रेत्याबरोबर ग्राहकही सतर्कता घेत आसल्याचे दिसून येते. शहरातील अनेक किराणा दुकान, औषधी दुकान, भाजीपालासह अन्य ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून मालाची विक्री आणि खरेदी होताना दिसत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!