नांदेड: पोलीस यंत्रणा सक्त : एकही २ व्हिलर व ४ व्हिलर रस्त्यावर धावणार नाही


नांदेड दि २७ मार्च प्रतिनिधी – नांदेड चे पोलीस अधीक्षक यांनी काल सुरक्षेच्या दृष्टीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते . त्यांनी जिल्ह्यात ४० विविध ठिकाणी पॉईंट्स निर्माण करून ब्यारिगेटेट्स लावण्यात आल्याचे सांगत अत्यावश्यस वाहने तेथून जातील, ट्रकस , मालवाहतूक वाहने पूर्ण तपासणी ,करूनच सोडले जाणार असून मेडिकल वाहने इमर्जनसी तपासून सोडण्यात येतील इतर कोणत्याही वाहनांना शहराच्या बाहेर जात येणार नाही किंवा आत येता येणार नाही हे स्पस्ट केले आहे . ज्यांना शिक्के मारून घरी बसण्यास सांगितले आहे जर ते बाहेर फिरताना दिसले तर त्यांच्या कडून विषाणूंचा प्रादुर्भाव पसरू शकतो त्यामुळे त्यांनी घरीच बसावे अन्यथा त्यांना हॉस्पिटल मध्ये पाठविले जाईल व पोलीस विभाग कडून लक्ष्य ठेवले जाईल . जिल्ह्यात अश्या २ केसेस आढळल्या आहेत . त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने गुन्हे दाखल केलेले आहेत शिका मारलेले हे प्रवाशी असून ते कुठेना कुठे तरी कोणाच्या संपर्कात आलेले असतात त्यामुळे सावधगिरी बाळगणने आवश्यक आहे . आज दि २७ मार्च पासून पोलीस यंत्रणा अत्यंत कडक केलीत जाणार असून दु चाकी व चार चाकी वाहनांना कुठेही जाण्यास स्थान नाही त्यामुळे कोणीही गाड्यांवर फिरू नये अन्यथा सक्त कारवाही केली जाईल असे सक्त आदेश पोलीस अधीक्षक यांनी काढले आहेत या बंदोबस्ताचा कोणालाही त्रास होणार नाही परंतु जनतेने या साठी सहकार्य करणे आवश्यक आहे . आपण आपल्या परिवारासह घरात सुरक्षित राहा व सरकारचे निर्देश पाळून पोलीस विभागाला सहकार्य करा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!